मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

ग्राहकांना दिलासा! सोने चांदी पुन्हा घसरली..आता कुठपर्यंत आले दर??

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२३ । जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झाल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. लग्नसराईचा सीजन संपता संपता दरात झालेली घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे. जळगावात 24 तासात सोन्याच्या किमतीत जवळपास 250 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.

सध्या जळगावात 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोन्याचा दर 59,800 रुपये इतका होता. तर चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 73,300 रुपये इतके आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात चांदीचा दर 73,500 इतका होता. म्हणजेच चांदी 200 रुपयांनी घसरली आहे.

आजचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज बुधवार सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 58,797 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा दर 70,252 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जागतिक पातळीवर बँकांच्या व्याज दरात वाढ झाल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकाकडे वळल्यानेत्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याचं किमतीत हळूहळू घट होताना दिसत आहे सोन्याच्या दरात अजून घट व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.