⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

जळगाव शहरवासियांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | 18 मे 2024 | जळगाव शहरवासियांसाठी पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. शहराचा आज शनिवारचा (दि. १८) पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. वाघूर पंपिंग व उमाळा जलशुद्धिकरण केंद्र येथील विद्युत वाहिनीवरील झाडांच्या फांद्या तोडण्यासह विद्युत वाहिनीची दुरुस्ती या कामामुळे हा पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला. आज शनिवारी होणारा पाणीपुरवठा रविवारी, तर रविवारचा सोमवारी व सोमवारचा मंगळवारी पाणी पुरवठा होईल.

खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण
पिंप्राळा हुडको, सेंट्रल बैंक कॉलनी, आशाबाबा नगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभूजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग. नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग.

डी. एस. पी. बायपास तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर. डी.एस.पी. टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर तिवारी नगर बाहेती शाळा इ. गिरणाटाकी आवारातील उंच टाकी- भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हे उर्वरित नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी इतर परिसर मेहरुण भागातील राहिलेला परिसर (बुस्टर पंप स. ४ वा. सुरू) मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर.

दुसरा दिवस-
अयोध्यानगर सदगुरूनगर, हनुमाननगर, लिलापार्क, गौरव हॉटेल या परिसरात शनिवारी होणारा पाणी पुरवठा रविवारी होईल.