खुशखबर ! जळगाव-पुणे विमानसेवेची २४ आणि २६ रोजी ट्रायल, तिकीट विक्री सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२४ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच जळगाव विमानतळावरून अखेर जळगाव-पुणे विमानसेवा सुरु होणार आहे. त्यासाठी ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे.
सात वर्षांपूर्वी जळगावातून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत तत्कालिन कंपनीने घोषणा केली होती. जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शुक्रवारी या अतिरिक्त व प्रायोगिक तत्वावरील विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे.
त्यानुसार जळगावातून २४ व २६ मे रोजी ट्रायल फ्लाइट दाखवल्या आहेत. या दोन्ही दिवशी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाइट उड्डाण भरेल ते पुण्यात ३ वाजून २५ मिनिटांनी लैंड होईल, अध्र्ध्या तासाने ही फ्लाइट परतीसाठी पुण्यातून ३ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण भरून जळगावात ५ वाजून २० मिनिटांनी लैंड होईल. तिकीट दराबाबत बोलायचं झाल्यास ट्रायल फ्लाइटसाठी जवळपास १९९१ आणि २४५० रुपये इतके तिकीट दर ठेवण्यात आले आहे.