ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आजचा दर पहा..

जून 6, 2023 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२३ । सोने खरेदी करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच उच्चांकापासून सोन्याची किंमत तब्बल दोन हजार रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. सोबतच चांदीही घसरली आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्त सोन चांदी खरेदीची संधी आहे.

Gold jpg webp

जळगावात सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 54,900 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,000रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. यापूर्वी चार दिवसापूर्वी सोन्याचा दर 61 हजारांवर होता. त्यात आतापर्यंत 1000 रुपयाची घसरण दिसून येतेय. तसेच उच्चांक किमतीपासून सोने 2 हजार रुपयांहून अधिकने घसरले आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच 5 मे रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी 62,300 रुपया पर्यंत होता.

दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर सध्या विनाजीएसटी 72,500 रुपये इतका आहे. गेल्या चार दिवसापूर्वी चांदीचा दर 73400 रुपयापर्यंत इतका होता. त्यात आतापर्यंत 900 रुपयापर्यंतची घसरण आलेली दिसून येतेय. तसेच उच्चांक किमतीपासून चांदीचा दर तब्बल 5000 हजार रुपयांनी घसरला आहे. 5 मे रोजी चांदीचा दर 77000 हजार रुपयांवर होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 75 रुपयांनी वाढून 59,923 रुपयावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर 326 रुपयांनी वाढून 72,198 रुपयावर व्यवहार करत आहे.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now