सोने पुन्हा उच्चांकाच्या दिशेने, काय आहे आजचा सोने-चांदी भाव? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । लग्नसराईला नुकतीच सुरुवात झाली असून अशात मागील काही दिवसापासून भारतीय वायदा बाजारात, सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमती वाढताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंचे दर वाढत आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढत आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली असून यामुळे सततच्या वाढीने सोने पुन्हा उच्चांकाच्या दिशेने जाऊ लागले आहे. Gold Silver Rate Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सोन्याच्या किमतीत 185 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 52,903 रुपायांवर पोहोचला आहे. सोन्याचा भाव आज 52,743 रुपयांवर उघडला गेला. मात्र त्यानंतर वाढ होताना दिसून आली. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. आज 309 रुपयांनी वाढून 62,779 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव वधारले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती काल घसरल्या होत्या, आज त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.44 टक्क्यांनी वाढून 1,771.28 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत देखील 1.92 टक्क्यांनी वाढून 22.01 डॉलर प्रति औंस झाली आहे.

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत सुवर्णनगरीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,300 रुपये इतका होता. मात्र त्यानंतर वाढ होताना दिसून आलीय.सध्या 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास 52,700 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी 62,500 रुपये प्रति किलो इतकी आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)