सोने पुन्हा वधारले ; आज सोने-चांदी इतक्या रुपयांनी महागले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । भारतीय सराफा बाजारात सोमवारी सोने चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले आहे. सोबतच चांदी देखील वाधरली आहे. दरवाढीने सोने पुन्हा 57 हजाराच्या दिशेने जात आहे. आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 0.38 टक्क्यांनी महागले आहे. तर चांदी 0.44 टक्क्यांनी महागले आहे. Gold Silver Rate Today

आजचा काय आहे दर
आज सकाळी 11.30 वाजेपर्यंत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर 226 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सोने 56,723 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोबतच चांदी 300 रुपायांनी वाढली असून 66,443 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

सोन्याचा दर आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा किती खाली आहे ते जाणून घ्या
सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 2159 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 8557 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. एप्रिल 2011 मध्ये चांदीने 75,000 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तर तपासाच पण त्यासंबंधित कोणतीही तक्रार तुम्ही करू शकता.

जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून १९९ कोटी रुपये काढले
विशेष म्हणजे शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी जानेवारीमध्ये गोल्ड ईटीएफमधून १९९ कोटी रुपये काढून घेतले. यासह, गोल्ड ईटीएफमधून पैसे काढण्याचा हा सलग तिसरा महिना होता. SIP मधील विक्रमी प्रवाहामुळे गुंतवणूकदार इतर विभागांच्या तुलनेत समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये गोल्ड ETF मधून गुंतवणूकदारांनी 273 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 195 कोटी रुपये काढले. त्याआधी, ऑक्टोबरमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 147 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.