⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Today : दिलासादायक! सोन्याच्या दरात झाली घसरण, ‘हे’ आहेत ताजे दर

Gold Silver Today : दिलासादायक! सोन्याच्या दरात झाली घसरण, ‘हे’ आहेत ताजे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । जागतिक बाजाराचा परिमाण सोन्याच्या (Gold Rate) किमतीवर झालेला पाहायला मिळाला आहे. सोबतच चांदीवरही (Silver Rate) . सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असून आज मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचे भावात घसरण झाली. यामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 59 हजाराच्या खाली आहे. मात्र दुसरीकडे आज चांदीच्या दरात वाढ झाली. Gold Silver Rate Today

बाजार उघडताच सोन्याचा भाव 50 रुपयांनी घसरला. तर चांदीच्या दरात 170 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,184 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,110 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. वाढीनंतर चांदीचा भाव 72,030 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर?
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 0.07 टक्क्यांनी म्हणजेच 42 रुपयांच्या घसरणीसह 58,888 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​गेला. तर MCX वर चांदीची किंमत 0.23 टक्क्यांनी म्हणजेच 168 रुपयांच्या वाढीनंतर 72,110 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.