Gold Silver Rate : आजचे सोने आणि चांदी नवीन दर काय? जाणून घ्या..

मे 10, 2023 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । देशभरात लग्नसराईचे दिवस सुरु आहे. यासाठी अनेक जण सोने चांदीची खरेदी करतात. मागील काही दिवसात सोन्यासह चांदीच्या किमतीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे सोने आणि चांदी नवीनतम दर..

gold silver jpg webp

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. सोने 171 रुपयांनी घसरले आहे. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 61,248 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर देखील 171 रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदी 77,285 रुपयावर व्यवहार करत आहे.

काय आहेजळगावातील सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात कालच्या सकाळच्या किमतीपेक्षा आज सकाळी सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,800 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 56,300 रुपये होतील

तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,700 रुपये(विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 61,400 रुपये इतका होता. त्यात 300 रुपयाची वाढ दिसून येतेय. मात्र येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. Gold Silver Rate Today

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या किमतीत किंचित 100 रुपयाची घसरण दिसून येत आहे. सध्या चांदीचा एक किलोचा दर 76,800 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 76, 9000 रुपये होता. मात्र आगामी काही दिवसात चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

तुम्ही अॅपवरून शुद्धता तपासू शकता
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now