बाबो..! सोने 65,000 टप्पा ओलांडणार? आजचा 10 ग्रॅमचा भाव काय? तपासून घ्या..

मे 9, 2023 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । सोन्याच्या (Gold Rate) दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लग्नसराईच्या धामधूममध्येच सोन्याच्या किमतीने गेल्या आठवड्यातील गुरुवारी ऐतिहासिक कर आणि इतर शुल्कासहित 63,000 हजारांचा टप्पा गाठला होता. यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. मात्र येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

सोन्याच्या किमतीसह चांदीनेही (Silver Rate) विक्रमी उच्चांक गाठला आहे. चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत भावात पुन्हा चढउतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी भावासंबंधीची अपडेट घेऊन खरेदी करावी.

काय आहे आजचा सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,300 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,400 रुपये(विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये इतका होता. त्यात 200 रुपयाची वाढ दिसून येतेय.

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या किमतीत किंचित 100 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. सध्या चांदीचा एक किलोचा दर 76,900 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. विक्रमी उच्चांकापासून चांदीचा दर जवळपास 1000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. मात्र आगामी काही दिवसात चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली. सोन्याचा दर 128 रुपयांनी वधारला असून यामुळे सोन्याचा दर 61,055 प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदी दर 105 रुपयांनी वाढला असून एक किलोचा चांदीचा दर 77,184 रुपयांवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now