⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

चांदी तब्बल ५००० रुपयाने स्वस्त ; तपासा आजचे जळगावातील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात काल रविवारी चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. तब्बल २५०० हजाराने चांदीच्या भावात वाढ झाली होती. परंतु आज (१० मे) त्याहून दुप्पट म्हणजेच तब्बल ५००० हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर सोन्याचा भाव स्थिर आहे.

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  ४,८०२ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 

आज चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज (१० मे) चांदी दर ५००० रुपयांनी कमी झाला आहे. १ ग्राम चांदीचा भाव आज ७१. ०५ रुपये इतका असून १ किलोचा दर ७१,५०० रुपये इतका आहे.

दरम्यान, हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. यावेळी हा उत्सव 14 मे रोजी आहे. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते.