सोने - चांदीचा भाव

खरेदीदारांसाठी खुशखबर! महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी घसरण, नवीन दर काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२६ । सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एकीकडे मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना, दुसरीकडे जून महिन्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली दिसून आली आहे.

gold1june

महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या दरांनंतर झालेली ही घसरण खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे.

Goodreturns च्या माहितीनुसार, आज जळगाव सराफ बाजारात सकाळी बाजार उडताच २४ कॅरेट सोने दरात प्रति तोळा ८२० रुपयाची घसरण होऊन ते १,५६,२२० रुपयांवर पोहोचले आहे. सोबतच २२ कॅरेट सोन्याचा दर ७५० रुपयांनी घसरून १,४३,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. २४ आणि २२ कॅरेट सोबतच १८ कॅरेट सोन्याच्या दरातही ६१० रुपयाची घसरण होऊन ते १,१७,१७० रुपये प्रत १० ग्रॅमवर आले आहे.

दुसरीकडे आज सकाळी चांदी दरात कोणताही बदल दिसून आला आहे. सध्या एक किलो चांदीचा दर २,८०,००० रुपये इतका आहे.

दरम्यान, सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या बदललेल्या भूमिकेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम झाला आहे. परिणामी, सोन्याचे दरही घसरले आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार असून, बाजारात खरेदीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button