⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आनंदाची बातमी! पाच दिवसात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा जळगावातील ताजे दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२३ । सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. मात्र, असाहतच तुम्हीही सोने (Gold Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीनंतरही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडीचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या पाच दिवसात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण दिसून येतेय. त्यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. Gold Silver Price today

जळगाव सराफ बाजारात होळीच्या दिवशी (सोमवारी) 22 कॅरेट सोन्याचे (Gold Price) दर जवळपास 51,900 रुपये प्रति तोळा इतका होता तर 24 कॅरेट सोन्याचे दर अंदाजे 56550 रूपये प्रति तोळाने विकले जात होता. मात्र आता सध्या सोन्याचा दर 55 हजार 700 रुपये प्रति तोळ्यापर्यंत विकले जात आहे.

त्याचसोबत सोमवारी चांदीचा दर 66700 रुपये प्रति किलो इतका होता. आता सध्या चांदीचा दर 62300 रुपयांपर्यंत आहे. एकंदरीत गेल्या पाच दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 4400 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने-चांदी घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला असल्याने सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे.

घसरणीचे कारण?
जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याबाबतचे संकेत बैठकीत देण्यात आले. याचा थेट परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट होऊन सोन्याच्या दरावर दिसून आला. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाले असं सोने व्यावसायिकांनी सांगत आहेत.

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.