जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२६ । जागतिक बाजारातील अस्थिरता आणि आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतीय सराफा बाजारावर स्पष्टपणे उमटू लागला आहे. सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर, आज मंगळवारी बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा तब्बल ७१० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

किती आहे सोन्याचा दर?
सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून अद्यापही सोन्याचे दर दीड लाखाच्या वर आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटवर ताण पडत आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १ लाख ५३ हजार १५० रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमत प्रति तोळा १ लाख ४० हजार ४०० रूपये इतकी झाली आहे. २२ कॅरेट सोनं ६५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ५३० रूपयांनी कमी होऊन एक लाख १४ हजार ९०० रूपयांवर आले आहे.

घसरणीचे मुख्य कारण
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. डॉलरची किंमत वधारल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरला पसंती दिली, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि किमतीवर झाला आहे. बाजारातील या सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, खरेदीदार सावधगिरी बाळगत आहेत आणि खरेदी करण्यापूर्वी दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.











