ग्राहकांना दिलासा ! सोने झालं स्वस्त, आताचे नवीन दर तपासून घ्या

फेब्रुवारी 11, 2026 12:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२६ । सोन्या चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सध्या दोन्ही धातूंच्या दरात जोरदार उसळी पहायला मिळाली असून त्यामुळे सोने चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दरम्यान आज सोने दरात घसरण झालीय. १ तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

gS

बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीत रोज बदल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरचा दर आणि गुंतवणूकदारांची भूमिका यांचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. आजची घसरण दिलासादायक असली तरी सोन्याचे दर अद्याप दीड लाख रुपयांच्या खाली आलेले नाहीत. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाही.

Advertisements

काय आहे सोन्याचा भाव?
आज बुधवारी सोन्याच्या दरात १ तोळ्यामागे २७० रुपयांची घसरण होऊन ते १,५८,५१० रुपयावर पोहोचले आहे. तर २२ कॅरेटच्या सोन्यामागे २५० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,४५,३०० रुपये झाले आहेत. तसेच १८ कॅरेटमागे सोन्याचे दर २०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१८,८९० रुपये झाले आहेत.

Advertisements

दुसरीकडे आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत.चांदीचे दर १ किलोमागे २,९०,००० रुपये झाले आहेत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now