ग्राहकांना दिलासा ! आज सोने-चांदी दरात झाला ‘हा’ मोठा बदल, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा..

फेब्रुवारी 10, 2026 1:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढउतार होताना पाहायला मिळत असून दोन्ही धातूंचे दर कमालीचे वाढले आहे. एकीकडं लग्नसराईचे दिवस सुरु असताना सोन्यासह चांदीचे दर सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली होती मात्र आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. दुसरीकडे चांदी दरात मोठी घसरण झाली आहे.

gold silver

आज भारतामध्ये सोन्याच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नाही. सोन्याचे दर काल जेवढे होते तेवढेच कायम आहे. २४ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी १५,७९१ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी १४,४७५ आणि १८ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्यासाठी ११,८४४ रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर कालप्रमाणेच असल्यामुळे आज तुम्ही खरेदी करू शकता.

दुसरीकडे आज चांदी दरात १० हजार रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे एक किलो चांदीचा दर २,९०,००० हरुपयावर पोहोचली आहे. स्थानिक बाजारपेठेतील ही घसरण खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते, कारण ती थोडी कमी किमतीत उपलब्ध आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now