जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे भाव ऐतिहासिक पातळीवर; काय आहेत आताचे दर?

जानेवारी 29, 2026 5:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२६ । सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठताना दिसत असून आज गुरुवारी सकाळीच मार्केट उघडताच जळगावच्या सराफ बाजारामध्ये दोन्ही धातूंनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे.

gold silver 2 jpg webp

सोन्याचा तोळा 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या दराने चार लाखांचा आकडा पार केला आहे. व्यासायिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांच्यासाठी ही चिंता वाढवणारी बाब असून त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

जागतिक बाजारातील चलनवाढ, डॉलरच्या किंमतीत बदल, आणि मागणी-पुरवठ्याचे संतुलन हे या वाढीचे कारण आहे. त्याचबरोबर अनेक देशांमधील नागरिक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याचाच परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होतोय. सोन्यासह चांदीचे भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्याने खरेदीदारांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now