जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । सोने आणि चांदी दरात सुरु असलेल्या दरवाढ काही थांबताना दिसत नसून दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला जोरदार फटका बसणार आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२०० रुपयांनी महागले आहेत. दुसरीकडे आज चांदीचा दर स्थिर दिसून आला.

या दोन्ही धातूंच्या दरवाढीमागे अनेक कारणे आहेत. जागतिक बाजारात अस्थिरता, अमेरिकेचे टॅरिफ धोरणं, मध्यपूर्वेतील संघर्ष आणि केंद्रीय बँकांच्या व्याजदरांवरील निर्णयांमुळे गुंतवणूकदार आता पुन्हा एकदा सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. या वाढत्या मागणीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे..

दरम्यान, देशात सणासुदीचे दिवस सुरु आहे. उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी देशभरात दसरा साजरा केला जातो. आणि दसऱ्याच्या शूभ मूहूर्तावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. परंतु यंदा दसऱ्यापूर्वीच सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सलग दरवाढीने दोन्ही धातूंच्या किमतींनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे.
आज १ ऑक्टोबर रोजी देखील सोने महागले आहे. आज सोने दरात प्रति तोळा १२०० रुपयांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे आता प्रति तोळा सोन्याचे दर विनाजीएसटी १,१८,६४० रुपये झाले आहेत. हेच दर जीएसटीसह १,२२,१९९ रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचे दर १,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर विनाजीएसटी १,०८,७५० रुपये झाले आहेत. तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दरात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ८८,९८० रुपये झाले आहेत.
दुसरीकडे मात्र म्हणजे चांदी दरात कोणतीही वाढ अथवा घसरण झाली नाही. सध्या एक किलो चांदीचा दर १,५१,००० रुपये इतका आहे.












