⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

तीन दिवसात सोने २५०० रुपयांनी वधारले, काय आहे आजचे सोने-चांदीचे भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन (Rasia Urekain war) युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ७३० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५५,५०० रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात तब्बल १४५० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा प्रति किलोचा दर ७३,०६० रुपयावर आला आहे.

यापूर्वी काल सोन्याच्या दरात ९८० रुपयाची वाढ झाली होती. त्यामुळे काल सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५४,७७० रुपये इतका होता. तर चांदी ८३० रुपयाने महागली होती. त्यामुळे काल चांदीचा प्रति किलोचा दर ७१,६१० रुपये इतका होता. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर लॉकडाऊन काळातही सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२००रुपयावर पोहचले होते. त्यानंतर मात्र ते कमी-कमी होत गेले. मात्र आता पुन्हा रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर वधारत असून यामुळे सोने ५५ हजारांवर गेले आहे. तसेच त्या वेळी चांदी ७७ हजारावर पोहचली होती. आता ती पुन्हा ७३ हजारांच्या पुढे गेली आहे.दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

जळगाव सराफ बाजारात तीन दिवसात सोन्याच्या दरात जवळपास २५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ३५६० रुपयाची वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, गुरुवारी ५२,५००, शुक्रवारी ५२,९८० रुपये इतका होता. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३०, शुक्रवार ६९,५०० रुपये प्रति किलो इतका होता.