Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे भाव

gold
चेतन पाटीलbyचेतन पाटील
February 17, 2022 | 10:55 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ३४० रुपये किलोने महागली आहे. यापूर्वीही कालच्या सत्रात सोने ३१० रुपयांनी तर चांदी तब्बल १२१० रुपयांनी वाधरली होती. सध्या भाववाढीने सोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने जाऊ लागले आहे.

आजचा सोने-चांदीचा भाव?

आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,५६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६३,८३० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात ५२० रुपयाची वाढ झाली आहे तर दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली. चांदी १६७० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून येतेय.

जळगाव सराफ बाजारात ३१ जानेवारी २०२२ सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ४८,७३० इतका होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या महिन्याच्या १ फेब्रुवारी रोजी सोन्यात ७० रुपयाची वाढ होऊन सोने ४८,८०० प्रति तोळा इतक्यावर गेला होता. तर दुसरीकडे ३१ जानेवारीला चांदीचा ६२,४६० प्रति किलो भाव होता. तो १ फेब्रुवारीला ६२,४१० रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यातील दर

सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा
०५ फेब्रुवारी (शनिवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो
०५ फेब्रुवारी (शनिवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :

  • हिंदू एकजुटीचा आविष्कार दर्शवणारी सनातनची ‘हिंदु एकता दिंडी’ !       
  • सहकारी महिला वैद्यकीय अधिकार्‍याचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष शिक्षा
  • मनपा विशेष : सागर पार्कवर लग्न करायची हौस असल्यास मोजावे लागणार २ लाख रुपये
  • ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू
  • किराणा दुकानदार आहेत ? सावधान तुम्हला भरावा लागेल १०० रुपये दंड

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in सोने - चांदीचा भाव
Tags: goldJalgaonpricesilverचांदीसोने
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
sanjay mahajan

कंपनीच्या बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

Sarita koli third marriage

किनगावच्या तरुणाशी ‘त्या’ तरूणीचा तिसरा विवाह, कोठडी दरम्यान धक्कादायक खुलासा

crime 8 1

पाळीव कुत्र्याला मारल्याच्या संशयावरून चिंचखेड्यात दोन गटात राडा

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.