⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

रेपो दरवाढीनंतर सोने-चांदीच्या किमतीत झाला मोठा बदल ; जाणून घ्या नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२३ । देशात लग्नसराईचे दिवस सुरु आहे. अशातच मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत चढ-उतार सुरु असून आज सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील किंचित घसरण झालीय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा सोने-चांदीचा दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 पर्यंत सोने किंचित 70 रुपायांनी घसरले आहे त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 57,191 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमत किंचित 10 रुपयांनी घसरली असून यामुळे चांदी 67,521 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत साेन्याचे दर 57,800 हजार रुपये प्रतिताेळा तर दुसरीकडे चांदीचा दर 68200 रुपये प्रति किलो इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) पुन्हा एकदा वाढ केलीय. रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने रेपो दरात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. या रेपो रेट वाढीचा परिणाम हा सोने चांदीच्या किमतीवर फारसा बदल दिसून येत नाहीय.मात्र, आगामी काही दिवसात सोन्याचा भाव ६० हजार रुपयावर जाण्याची शक्यता आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क्स दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

22 आणि 24 कॅरेटमधील फरक
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24K सोने विलासी असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.