सोने लवकरच रेकॉर्ड तोडणार ; आज किती रुपयांनी महागले? घ्या जाणून आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । सोन्याच्या विक्रमी पातळीकडे वाटचाल करणाऱ्या वाढीला काल ब्रेक लागला होता.मात्र, आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने पुन्हा महागले आहे. सोबतच चांदी देखील महागली आहे. सोने हळुहळू 56,200 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाकडे जात आहे. Gold Silver Price Today

आज, म्हणजे शुक्रवार, 6 जानेवारी रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 55 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,345 रुपये तोळ्यावर गेला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरून 55,267 रुपयांवर बंद झाला होता.

तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत 247 रुपयाची वाढ दिसून येतेय. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 68,325 रुपयावर व्यवहार करत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 1,168 रुपयांनी घसरून 68,150 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात नरमाई आहे. सोन्याचा स्पॉट भाव आज 0.83 टक्क्यांनी घसरून $1,836.66 प्रति औंस झाला. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर कमालीचा घसरला आहे. चांदीची किंमत 1.83 टक्क्यांनी घसरली आणि 23.37 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीतही सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येतेय. सध्या जळगाव सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,600 रुपये इतका आहे. GST सह हा दर जवळपास 57000 रुपयापर्यंत जातो. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,500 ते 51000 पर्यंत होता. तर चांदीचा दर 58 हजारापर्यंत होता. मात्र त्यात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली आहे.