सोनं लग्नाचं बजेट बिघडवणार? आज झाली मोठी वाढ, वाचा आजचे प्रति १० ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२३ । ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीचे (Silver Rate) दर प्रचंड वाढले आहे.दरम्यान, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आठवड्यातील पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोने महाग झाल्याचे दिसून आले. सोबतच चांदी देखील महागले आहे. आज सकाळी 10.30 सोने वाजेपर्यंत सोने 0.69 टक्क्यांनी महागले आहे. तर चांदी 0.39 टक्क्यांनी महागली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील दर?
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 पर्यंत ३९० रुपायांनीं वाढले आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 56,975 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 57,800 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 263 रुपयाची वाढ झाली आहे त्यामुळे चांदी 67,839 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

कोरोना महामारीदरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 इतका उच्चांक दर गाठला होता. मात्र त्यानंतर आता अडीच वर्षानंतर सोन्याच्या (Gold Rate) किमतीने आतापर्यंतचा सर्व रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच सोन्याने 58 हजाराचा टप्पा ओलांडला होता. आता पुन्हा सोने 58 हजाराच्या उंबरवठ्यावर आहे Gold Silver Rate Today

गेल्या आठवड्याभरात सोने-चांदी किती महागली?
गेल्या व्यावसायिक आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास 800 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 1400 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे.

जळगावातील दर
जळगाव सवर्णनगरीत साेन्याचे दर 58 हजार रुपये प्रतिताेळा तर दुसरीकडे चांदीचा दर 68000 रुपये प्रति किलो इतका आहे.

गेल्या या आठवड्यात सोन्याचा दर किती बदलला?
30 जानेवारी 2022 – 57,079 रुपये प्रति 10 ग्रॅम
31 जानेवारी 2022 – रु 56,865 प्रति 10 ग्रॅम
01 फेब्रुवारी 2022 – रु 57,910 प्रति 10 ग्रॅम
02 फेब्रुवारी 2022 – 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 फेब्रुवारी 2022 – रु 57,800 प्रति 10 ग्रॅम
04 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी
05 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी

गेल्या या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला?
30 जानेवारी 2022 – रुपये 68,149 प्रति किलो
31 जानेवारी 2022 – रुपये 67,671 प्रति किलो
01 फेब्रुवारी 2022 – रुपये 69,445 प्रति किलो
02 फेब्रुवारी 2022 – रु 71,576 प्रति किलो
03 फेब्रुवारी 2022 – रुपये 69,539 प्रति किलो
04 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी
05 फेब्रुवारी 2022 – बाजार सुट्टी