⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, चांदीही घसरली, वाचा आजचे नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीचे (Silver Rate)भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सोने सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज शुक्रवारी सोने भावात ८० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात ७०० रुपयाची घसरण झाली आहे. यापूर्वी गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने किंचित ४० रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदी १४० रुपयांनी महागली होती. दरम्यान,आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आ

आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोने ४८,९७० रुपये प्रति तोळा इतका आहे. चांदीचा भाव ६२,१६० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात पडछड नोंदविल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोने खरेदीला पुन्हा प्राधान्य दिले होते. सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात ३०० रुपयापर्यंची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण दिसून आली. तर चालू आठवड्यात देखील सोन्याच्या किंचित २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

चालू आठवड्यातील दर

सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :