सोने-चांदीमधील घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आज कितीने महागले

मार्च 31, 2022 11:11 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । मागील तीन दिवस सुरु असलेल्या सोने आणि चांदीमधील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात १५० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ४७० रुपयाने महागली आहे. दरम्यान, यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ७८० रुपयाने तर चांदीच्या दरात ११८० रुपयाची घसरण झाली होती.

gold rate 2

आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,१५० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,९९० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

मागील काही दिवसापासून जागतिक बाजारातील घसरणीमुळे भारतातील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यापूर्वी सलग तीन दिवसाच्या घसरणीने सोने १३०० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर मागील तीन दिवसांत चांदीमध्ये तब्बल २४३० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने भावात जवळपास ४५० ते ५०० रुपयाची वाढ दिसून आली तर चांदीच्या दरात ९०० ते ९५० रुपयांची वाढ झालेली दिसून आलीय.

रशिया युक्रेन युद्धामुळे या महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल दिसून आला. २८ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ५१,४०० रुपये प्रति तोळा इतका होता. मात्र त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या ९ दिवसात सोने दोन वर्षाच्या उच्चांक पातळीवर पोहोचले होते. ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,०९० रुपये होते. तर २९ मार्च रोजी ५२,७८०, ३० मार्च रोजी ५२,०००, तर आज ३१ मार्च ५२,१५० प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे २८ मार्च ला चांदी ७०,४५० प्रति किलो होती. २९ मार्च ६९,७००, ३० मार्च ६८,५२०, तर आज ३१ मार्च ला ६८,९९०,रुपये प्रति किलो इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now