जळगाव लाईव्ह न्यूज । 3 फेब्रुवारी २०२२ । मागील काही दिवसापासून जळगाव सुवर्ण नगरीत सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येतेय. गेल्या दोन दिवसाच्या दरवाढ नंतर आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज सोने ४० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी १४० रुपयांनी महागली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने २९० रुपयांनी वधारले होते तर चांदी ३९० रुपयांनी महागली होती.

आजचा सोने आणि चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सोने ४९,०५० रुपये प्रति तोळा इतका आहे. चांदीचा भाव ६२,९४० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळाले. गेल्या महिन्याच्या १ जानेवारीला सोने ४९,०१० प्रति तोळा इतका होता. तर चांदी ६३,६२० रुपये प्रति किलो इतका होता. काल महिन्याच्या अखेरीस सोने ४८,७३० रुपये प्रति तोळ्यावर आला होता. तर चांदी ६२,४६० रुपये किलोवर आले होते.
चालू आठवड्यातील दर
सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.
हे देखील वाचा :
- आनंदवार्ता ! भुसावळमार्गे आणखी दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस धावणार; रेल्वे बोर्डाची घोषणा..
- सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक! जळगावात चांदी तब्बल ५ हजारांनी स्वस्त, सोनेही घसरले
- प्रवाशांनो लक्ष द्या! १५ ऑगस्टपासून बडनेरा–नाशिक रोड मेमूच्या सेवेत ‘हा’ मोठा बदल
- बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
- गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.











