⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२२ । आज देशभरात धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशी दिवशी (Dhanteras 2022) सोनं चांदी खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी लोक सोने-चांदी खरेदी करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अगदी आधी सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. Gold Silver Price Today

MCX वर सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
MCX वर प्रति 10 ग्रॅम सोने 50,635 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दुसरीकडे चांदी 57,670 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

दरम्यान, गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या धनत्रयोदशीला सोने महागच आहे. गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 48 हजारापर्यंत होता. तर चांदी मात्र महाग होती. त्यावेळी चांदीचा प्रति किलोचा दर 63 हजारावर होता. त्यानुसार यंदा सोने महाग तर चांदी घसरलेली दिसतेय.

दरम्यान कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ऑगस्ट 2022 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले होते. त्यानतंर सोने सावरले होते. मात्र यावर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने पुन्हा महागले होते. या वर्षी मार्च 2022 मध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता सोन्याचा भाव 50 हजारावर गेला आहे. म्हणजेच यंदाच्या विक्रमी उच्चांकापेक्षा यावेळी सोने सुमारे 5000 रुपयांहुन अधिकने स्वस्त आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात घसरण दिसून येतेय. सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,070 रुपयांपर्यंत आहे. तो यापूर्वी 46,300 रुपयांपर्यंत इतका होता. तर सध्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,300 इतका आहे. तो याआधी 50,600 रुपये इतका होता. दरम्यान, दुसरीकडे चांदी मात्र महागली आहे. सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 56,700 रुपये इतका आहे. तो यापूर्वी 56,300 इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आज सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता तपासा-
सोने ही अत्यंत महत्त्वाची वस्तू मानली जाते. अशा स्थितीत सध्या बाजारात बिनदिक्कतपणे बनावट दागिन्यांची विक्री होत आहे. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना सोने खरेदी करण्यापूर्वी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हॉलमार्कद्वारे तुम्ही खऱ्या आणि बनावट सोन्यात फरक करू शकता. यासोबतच सांगा की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदी करा. तुम्हाला तुमच्या शहरातील 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन माहिती मिळवू शकता.