सोने-चांदी पुन्हा विक्रमी पातळी गाठणार? पहा आजचे नवे दर..

जुलै 21, 2023 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । अमेरिकेतील घडामोडीचा परिणाम मौल्यवान धातूंवर झालेले पाहायला मिळत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता २० जुलै पर्यंत सोने-चांदीत मोठी उसळी आली आहे. त्यामुळे सोने आणि (Gold Rate) चांदी (Silver Rate) पुन्हा नवीन रेकॉर्ड करणार का? असा प्रश्न ग्राहकांना पडतोय. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीतील दरवाढीला आज ब्रेक लागलेला दिसून आला आहे. दोन्ही धातूंमध्ये घसरण झालेली दिसून येतेय.

gold silver 3

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत किंचित ५० रुपयाची घसरण झाली असून यामुळे आता सोने ५९,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर देखील ५० रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदीचा दर ७५,३९६ रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने-चांदीचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीने ६० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ५५,२०० रुपये इतका आहे. तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव विनाजीएसटी ६०,३०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ७६,५०० रुपयावर विकला जात आहे.

सोने आणि चांदीची आगेकूच सुरु आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आता पर्यंत सोने-चांदीत मोठी उलाढाल झाली. दोन्ही धातूंनी मुसंडी मारली. या महिन्यात सोन्याने २२०० ते २४०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने ६००० ते ६५०० रुपयांची झेप घेतली आहे. अजून दोन्ही धातूंना किंमतीत नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now