सोने-चांदीच्या भावात ‘या’ वर्षातील सर्वात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा भाव

मार्च 2, 2022 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम थेट जागतिक बाजारावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. आज बुधवारी सोने तब्बल १६३० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ३०५० प्रति किलोने महागले आहे.

gold

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,०३० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६८,५७० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ भांडवली बाजाराला बसत आहे. या अनिश्चित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांनी धाव घेतली आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून बाजारात सोने-चांदीमधील तेजी कायम आहे. आजच्या दरवाढीने सोने ५३ हजारांवर गेले आहे. तर चांदी ६८ हजारावर गेली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५०, बुधवारी ५१,५१०, गुरुवारी ५१,५६०, शुक्रवारी ५२,७५० रुपये प्रति तोळा इतका होता. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८०, बुधवारी ६५,८५०, गुरुवारी ६६,१००, शुक्रवारी ६७,५८० रुपये प्रति किलो इतका होता.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now