ग्राहकांना मोठा दिलासा! चांदी 5 हजारांनी घसरली, सोनेही घसरले..

मे 13, 2023 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । मागील काही काळात जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले. ऐन लग्नसराईत दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना मोठा झटका बसला होता. मात्र आता किमतीमध्ये बदल दिसून आला. गेल्या दोन दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 5000 रुपयांहून अधिकची घसरण झालीय आहे. सोनेही घसरले आहे. Gold Silver Price Today

gold silver 1 jpg webp

जळगावातील सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,300 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,300 रुपये(विनाजीएसटी) इतका आहे. शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 61,500 रुपयापर्यंत होता. मात्र येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. 

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी सकाळी एक किलो चांदीचा दर 78000 (विनाजीएसटी)रुपयापर्यंत होता. तो आता 73000 (विनाजीएसटी) हजारावर आला आहे. म्हणजेच दोन दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 5000 रुपयाची घसरण झाली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 60,898 रुपयावर बंद झाला आहे. चांदी 708 रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदी 73,100 रुपयावर बंद झाला आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now