⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

खुशखबर! सोने-चांदी किमतीत झाली मोठी घसरण, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । कमजोर जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींनी भारतीय सराफा बाजारात घसरण नोंदवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांक गाठल्यानंतर या आठवड्यात सोने घसरताना दिसून आले. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 61 हजाराखाली आला आहे. सोबतच चांदीही घसरली आहे. अशात सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. Gold Silver Rate 12 May 2023

काय आहे मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आज दर?
मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने किंचित 97 रुपयांनी घसरले आहे. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 60,795 रुपयावर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दरात मोठी घसरण झालेली दिसून येतेय. चांदी 507 रुपयांनी घसरला असून यामुळे एक किलो चांदी 73,301 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगावातील सोने-चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 56,650रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,500 रुपये(विनाजीएसटी) इतका आहे. सोन्याच्या दरात 300 रुपयापर्यंतची घसरण दिसून येतेय. परंतु येत्या काही दिवसात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. 

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. सध्या चांदीचा एक किलोचा दर 76,200 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी काल सकाळी 78,000 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 1600 ते 1800 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र आगामी काही दिवसात चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.