सोमवार, डिसेंबर 11, 2023

चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सोनं मात्र स्थिर ; तपासून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । मागच्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात कोणातीही नवीन रेकॉर्ड झाला नाही. उच्चांकापासून सोन्याचा दर खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जळगाव सराफ बाजारात सध्या सोन्याचा दर स्थिर आहे. मात्र चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय.

आजचा जळगावातील दर?
जळगावात सध्या सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम सोने 58,500 रुपये विनाजीएसटी रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 69,900 रुपयावर आला आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर 70,300 रुपयांना विकले जात होता. म्हणजेच चांदीच्या किमतीत 400 रुपयाची घसरण झालेली आहे. यापूर्वी 25 जून रोजी चांदीचा भाव 69000 रुपये किलोवर आला होता.

मे-जूनमध्ये दिलासा
सोने मोठा टप्पा गाठेल, असा दावा करण्यात येत होता. मे महिन्यात सोने 70 हजार मनसबदार होण्याचे स्वप्न पाहत होते. तर चांदी 80,000 टप्पा ओलांडेल असा दावा करण्यात येत होता. पण मे महिन्यात दोन्ही धातूंनी माघार घेतली. कोणताच नवीन रेकॉर्ड केला नाही. दोन्ही धातूंमध्ये पडझड झाली. जून महिन्यात घसरण कायम होती. सोने तर 59,000 रुपयांपर्यंत खाली घसरले तर चांदी 70,000 रुपयांपर्यंत उतरली. जुलै महिन्यात या किंमती अजून किती घसरतात, याकडे ग्राहकांचे आणि सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे.