आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठा बदल; खरेदीपूर्वी आताचे दर तपासून घ्या

मे 5, 2025 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । यंदा अक्षय तृतीयपुर्वीच सोने दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र अक्षय तृतीयनंतर आजपर्यंत सोने दरात मोठी घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला. २२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव १,००,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला तेव्हा तो त्याच्या सर्वोच्च किमतीवर होता. मात्र तेव्हापासून सोन्याची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसतेय. तुम्हीही आज सोने खरेदीला जाणार असाल तर आताचे ताजे दर तपासून जा..

gold 6 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत ३,५०० रुपयांची घसरण झालीये. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,७५० रुपये आहे आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९५,८०० रुपयांच्या आसपास आहे.

आजचा चांदीचा भाव
सोमवार ५ मे २०२५ रोजी चांदीची किंमत ९७००० रुपये प्रति किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत १,००० रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment