⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार सुरूच; खरेदीला जाण्यापूर्वी तपासा आजचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । मागील अनेक दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार सुरूच आहे. गेल्या दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोने किंचित ३० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सोने ५१,९५० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
तर दुसरीकडे आज चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. चांदी ५४० रुपयाने महागली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,७१० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोने ११० रुपयांनी तर चांदी २०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
आंतरराष्ट्रीय घडामोडी सोने आणि चे एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. यापूर्वी रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध दरम्यान ९ मार्च २०२२ रोजी सोन्याचा प्रती तोळ्यांचा दर ५५,६०० रुपयांवर गेला होता. तर चांदी तब्बल ७३ हजारांवर गेली होती. मात्र त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती.

गेल्या चार महिन्यात सोने जवळपास ३ हजाराहून अधिक रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी तब्बल १० हजाराहून अधिक घसरली आहे.
गेल्या आठवड्यात सोने दोन वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे. त्यामुळे हालचालीमुळे सोने किंचित ५० रुपयापर्यंत महागले आहे. तर दुसरीकडे चांदी किंचित १०० रुपये ते १५० रुपयांनी महागले आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१३ जून २०२२- रुपये ५२,९१० प्रति १० ग्रॅम
१४ जून २०२२ – रुपये ५१,८५० प्रति १० ग्रॅम
१५ जून २०२२ – रु ५१,३७० प्रति १० ग्रॅम
१६ जून २०२२ – रु ५१,६२० प्रति १० ग्रॅम
१७ जून २०२२ – रु ५१,१८० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१३ जून २०२२- रुपये ६३,३८० प्रति किलो
१४ जून २०२२ – रुपये ६१,७२० प्रति किलो
१५ जून मे २०२२- रुपये ६०,९०० प्रति किलो
१६ जून मे २०२२- रुपये ६२,१२० प्रति किलो
१७ जून मे २०२२- रुपये ६२,९७० प्रति किलो