जळगावच्या बाजारात आज सोने 1200 रुपयांने तर चांदी 3000 रुपयांनी महागली
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२३ । ऐन लग्न सीजनच्या काळात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत असून गेल्या काही दिवसापूर्वी जळगावच्या बाजारात विनाजीएसटी ६४ हजार रुपयाच्या विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या दरात काल बुधवारी २८०० रुपयांची घसरून दिसून आली.मात्र आज गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. चांदीही महागली.
जळगावच्या बाजारात विनाजीएसटी ६४ हजार रुपयाच्या विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या दरात काल बुधवारी २८०० रुपयांची घसरण झाली होती. यापूर्वी गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. त्यामुळे बुधवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६१ हजार ३०० रुपयावर आला होता. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता.
मात्र आज गुरुवारी जळगावच्या बाजारात सोन्याचे दरात तब्बल १२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६२,३०० रुपयांवर गेला.दरम्यान, आज चांदीच्या किमतीत देखील तब्बल ३ हजार रुपयाची वाढ झाली. या वाढीनंतर चांदीचा एक किलोचा विनाजीएसटी दर 75 हजार रुपये झाले आहेत. ऐन लग्न सीजनच्या काळात दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. अमेरिकन बँकांचे व्याजदर हे वाढणार नसून यामुळेच ही भाववाढ होत असल्याची माहिती जाणकारांनी दिली.