जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । दरवेळी काहींना काही कारणामुळे गिरीश महाजन चर्चेत राहतात. गिरीशभाऊ सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.
यावेळी त्यांनी प्रचारादरम्यानचे काही छायाचित्र स्वतःच्या फेसबुक पेजवरून पोस्ट केले होते. यातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. या फोटोसंदर्भात २-४ पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.
https://www.facebook.com/piyush.patil.1272/posts/2234203060048603
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे तांडव वाढत असतांना गिरीश महाजन पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त असल्याने काही जणांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. आधी आपल्या मतदार संघाकडे लक्ष द्या असा सल्ला काहींनी गिरीश महाजन यांना दिला आहे.
https://www.facebook.com/AamchJalgaon/photos/a.220912934699230/2515955261861641/
गिरीश महाजनांवरील टीकेला काही भाजप समर्थकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे देखील यावेळी दिसून आले. भाजप समर्थकांकडून तेच फोटो शेअर करत गिरीशभाऊंचे समर्थन करण्यात आले असून त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार रथावर बोलविल्याचा उल्लेख केला आहे.