जळगाव पोलिसांकडून मोठी कारवाई; तब्बल १५ लाखांचे शेडको हरवलेले मोबाईल केले हस्तांतरित

मे 27, 2026 2:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२६ । जळगाव जिल्हा पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत तब्बल १५ लाखांहून अधिक किमतीचे ११० मोबाईल शोधून काढले असून, ते मूळ मालकांना सन्मानाने परत केले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यांनी ही कारवाई केली.

MB

भुसावळ उपविभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून एकूण ६८ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच मुक्ताईनगर उपविभागात बोदवड, सावदा आणि वरणगाव पोलीस ठाण्यांच्या मदतीने ४२ मोबाईल शोधून काढण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत ५ लाख ७५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलने आणि स्थानिक पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या सर्व मोबाईलचा माग काढला. मोबाईल ट्रॅकिंग आणि आधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने हे कठीण काम पोलिसांनी फत्ते केले. अनेक नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्यानंतर पोलिसांचे आभार मानले.

जिल्हा पोलिसांकडून नागरिकांना मोबाईल हरवल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षित ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now