---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंसह उन्मेष पाटीलांवर निशाणा; म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंसह ठाकरे गटाचे माजी खासदार यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली असं म्हणत एकनाथ खडसेंचे नाव न घेता टीका केली.

girish mahajan unmesh patil eknath khadse jpg webp

तर “2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांना मीच तिकीट नाकारलं होत. त्यावेळी मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र ज्यांनी तिकीट मिळालं त्यांना तब्बल पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणलं. मात्र यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून.. ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राला बळीचा बकरा केला,” असा टोला उन्मेष पाटील यांंना लगावला.

---Advertisement---

“या निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला. उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेला तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाचा भरोशावर आहोत. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे. मी मी म्हणणारे आता कसे बसले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे,” असे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

दरम्यान, जळगावत भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन भाजपचे निरीक्षक आमदार खासदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---