गिरीश महाजन द्वितीय कन्येच्या लगीनघाईत व्यस्त

मार्च 17, 2022 12:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । भाजपचे (BJP) नेते आ गिरीश महाजन (girish mahajan) सध्या आपल्या मुलीच्या लगीनघाईत व्यस्त असून २० मार्च रोजी त्यांच्या द्वितीय कन्येचा जामनेर (jamner) येथे विवाह सोहळा आहे. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत गिरीश महाजन आपल्या जामनेर येथील निवासस्थानी मुलीच्या लग्नाची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. विवाह मंडपाची तयारी असेल, वरातीसाठी लागणारा घोडा असेल, अशा अनेक कामाच्या लगीनघाईत गिरीश महाजन सध्या व्यस्त आहेत.

jamner girish mahajan

कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षात अनेक नेत्यांनी मुलांची लग्न साध्या पद्धतीने केली. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नेत्यांनी मुलांची लग्न केली. महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांवरती बंधनं असल्यामुळे कार्यक्रमाला अनेकांना बोलावणं शक्य नव्हतं.सध्या गिरीश महाजन मुलीचं लग्न जळगावमध्ये कशा पद्धतीने करतायेत याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लग्नाच्या कार्यात महाजन व्यस्त असल्याने शाही पद्धतीने विवाह करील असा अनेकांचा अंदाज आहे. कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आपल्या मुलांची शाही पद्धतीने केली आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now