एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने गिरीश अजूनपर्यंत रडतोय : अजित पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने गिरीश महाजन अजूनही रडत असल्याची खोडसर टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.राहुल नर्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अजित पवार भाषण करत होते. (Ajit Pawar On Girish Mahajan)
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपा मध्ये गेलेल्या सर्व आमदारांची कौतुक केले. या सर्व आमदारांना पहिल्या रांगेत स्थान मिळत असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांचा नाव घोषित केल. त्यावेळी भाजपचे सर्व कार्यकर्ते ढसाढसा रडले असे अजित पवार म्हणाले.
ते इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, हा संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. विरोधी बाकावरील नेत्यांना देखील हा शॉक लागला. या शॉक मधून अजून गिरीश महाजन बाहेर पडले नसून ते अजूनही त्या निर्णयामुळे रडत आहेत. दादा भुसे यांना देखील यापुढे मंत्रीपद मिळेल की नाही माहित नाही याचबरोबर जे आमदार शिवसेनेतून गेले आहेत त्यांना तरी अजून मंत्रीपद मिळेल की नाही माहित नाही असेही अजित पवार म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेग आला. या निवडीत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. भाजपचे राहुल नार्वेकरयांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी दिली. आधी आवाजी मतदान झाले त्यानंतर मतदान हे वैयक्तिक मतदानाने झाले.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत झाली यात राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मत मिळाली.