⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

थांबा..! रेल्वेच्या जनरल तिकिटाचा हा ‘खास’ नियम तुम्हाला माहितीय का? मग घ्या जाणून, अन्यथा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । भारतीय रेल्वेनं दररोज लाखोंच्या संख्यने लोक प्रवास करतात असतात. रेल्वे प्रवासाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल जात जाते. त्या मागील कारण म्हणजेच कमी भाडे आणि सुरक्षित प्रवास होतो. रेल्वेकडून अनेक नियम बनविले गेले आहेत. यातील एक म्हणजे जनरल तिकिटाच्या नियमांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याची रेल्वेच्या रोजच्या प्रवाशांनाही माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊयात हा नियम नेमका काय आहे..

काही गाड्या सोडल्या तर रेल्वे गाडीला जनरल डब्बे असतातच. बहुतांश लोक आरक्षण तिकीट न मिळण्यास जनरल तिकीट घेऊन जनरल बोगीतून प्रवास करतात. साधारणपणे लोक सामान्य बोगीतूनच कमी अंतराच्या प्रवासासाठी प्रवास करतात. पण, रेल्वेच्या जनरल तिकिटाचा असा नियम आहे,ज्याची काही प्रवाशांना माहितीही नसेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सामान्य तिकिटाची वैधता देखील आहे. तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही निर्धारित वेळेत त्याचा वापर करून प्रवास करू शकता.

दिवसभर अनारक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची फसवणूक थांबवण्यासाठी रेल्वेने प्रवास सुरू करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी वेळेचे बंधन नसल्यामुळे तिकिटांचा गैरवापर होत होता. त्यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. हे टाळण्यासाठी रेल्वेने 2016 मध्ये सर्वसाधारण तिकिटांची अंतिम मुदत निश्चित केली.

सामान्य तिकीट 3 तासांसाठी वैध आहे
भारतीय रेल्वेचे नियम सांगतात की, जर तुम्हाला 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला जनरल तिकीट काढल्यानंतर 3 तासांच्या आत ट्रेन पकडावी लागेल. तर 200 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी 3 दिवस आधी जनरल तिकीट काढता येईल. जर एखाद्या प्रवाशाने 199 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट काढले तर त्याला ज्या स्थानकावर जायचे आहे त्या स्थानकावर जाणारी पहिली ट्रेन सुटेपर्यंत किंवा तिकीट खरेदी केल्यानंतर 3 तासांनी प्रवास सुरू करावा लागेल.

दंड भरावा लागू शकतो
आता एखाद्या प्रवाशाने 199 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी खरेदी केलेल्या तिकिटावर तीन तासांनंतर प्रवास केला, तर ते तिकीटविना तिकीट समजून दंड आकारण्याचा अधिकार रेल्वेला आहे. जर प्रवास 3 तास सुरू झाला नाही तर प्रवासी तिकीट रद्द करू शकत नाही किंवा इतर कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही.