⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अखिल भारतीय बडगुजर समाजाचे लाेहारीत येथे उद्यापासून महाअधिवेशन

अखिल भारतीय बडगुजर समाजाचे लाेहारीत येथे उद्यापासून महाअधिवेशन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२३ । लाेहारी (ता. पाचाेरा) येथील बडगुजर समाज चामुंडा माता मिशनतर्फे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे महाअधिवेशन ७ व ८ जानेवारी राेजी चामुंडामाता मंदिर, लाेहारी येथे आयाेजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र, गुजरातसह विविध राज्यातून समाजबांधव उपस्थित राहणार आहे. अधिवेशनात विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिवेशनात पहिल्या दिवशी ७ राेजी सकाळी ८ ते ९ वाजता ग्रंथ पूजन, नगर प्रदक्षिणा साेहळा महामंडलेश्वर याेगीराज महाराज (शेलगावकर) व गजानन मंगल जाेशी यांच्या हस्ते हाेईल. अध्यक्षस्थानी अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष उमेश कराेडपती हे असतील. उद‌्घाटन अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी, दीपप्रज्वलन मुंबईच्या उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष बापू बडगुजर, प्रतिमा पूजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते हाेईल. त्यानंतर सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान समाजातील शेतकरी दुर्लक्षित विवाह समस्या, महिला संघटन व सक्षमीकरण काळाची गरज, समाजातील घटस्फाेटातील विदारक समस्या, सुशिक्षित बेराेजगार युवक-युवतींना उद्याेग व्यवसायाकडे वळणे काळाची गरज, शैक्षणिक प्रगतीपण याेग्य मार्गदर्शन काळाची गरज, तालुकास्तरावर वैद्यकीय प्रतिनिधी नेमणे, ओबीसी केंद्रीय आरक्षण विकासाची गुरुकिल्ली या सामाजिक विषयावर चर्चा होईल. रात्री ९ ते १० वाजता सामाजिक प्रबाेधनावर व्याख्यान हाेणार आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ८ जानेवारी राेजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थित कार्यक्रम हाेणार आहे. ते समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमाचे उद‌्घाटन खासदार सी. आर. पाटील (सुरत) यांच्या हस्ते हाेईल. संभामंडपाचे भूमीपूजन आमदार किशाेर पाटील, स्मरणिका प्रकाशन ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन, गाेशाळा उद‌्घाटन पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे माजी अध्यक्ष उमेश कराेडपती हे असतील. प्रतिमा पूजन अ. भा. बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन उद्याेगपती कैलास बडगुजर यांच्या हस्ते हाेणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ज्ञानेश्वर पाटील (खंडवा), खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार जयकुमार रावल, आमदार चंदूभाई पटेल, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय शिरसाठ, आमदार सुरेश भाेळे, आमदार संजय सावकारे, आमदार लता साेनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संगीता पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित राहणार आहे. अधिवेशनासाठी विविध समित्या गठीत केल्या आहे. अधिवेशनास बडगुजर समाजबांधवांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन बडगुजर समाज चामुंडा माता मिशनतर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.