बातम्यावाणिज्य

सर्वसामान्यांना महागाईचा धक्का, गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, हे आहेत नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसला आहे. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (शुक्रवार) तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली.

१ नोव्हेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ करण्यात आली. यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1802 रुपये झाली. सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत.

सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मार्चपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील चार महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे.

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button