⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन १४ ठिकाणी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । डोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात विविध १४ ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून कॅमेऱ्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डोणगावच्या सरपंच आशाबाई सुरेश पाटील, उपसरपंच मनोहर भालेराव यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्यांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. गावातील बहुतांश नागरीक शेतकरी व मजूर आहेत. त्यामुळे दिवसा गावात शुकशुकाट असतो. त्यामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील मुख्य चौक, मंदिर, दर्ग्यासह वर्दळीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे चोरीसह अन्य गुन्ह्यांवर नियंत्रण येईल. ग्रा.पं. सदस्य सुर्यभान पाटील, शांताराम पाटील, माधुरी कोळी, सरला पाटील, भावना ठोके यांनी हा निर्णय सरपंच, उपसरपंचांसह घेतला. ग्रामसेवक दिनेश पाटील, ईश्वर पाटील यांनी सहकार्य केले.