⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा तालुक्यात भीषण अपघात ! भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले

पाचोरा तालुक्यात भीषण अपघात ! भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२४ । पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडले असून अपघातानंतर भरधावकारही पलटी झाली आहे. या भीषण अपघातात एका 16 वर्षीय विद्यार्थिनीसह 60 वर्षीय वृद्ध जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले असून घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली आहे.

याबाबत प्राप्त माहीती अशी की, गुरुवारी सायंकाळी ५:४५ वाजेच्या दरम्यान शाळेतुन मुले घरी येत असतांना, शेतातुन शेतकरी शेतमजुर घरी येत असतांना पाचोर्‍याकडन लाल कलरची स्विप्ट डिझायर ही गाडी भरधाव वगाने जळगाव कडे जात असतांना गोराडखेडा गावाच्या जवळ या कारने चौघांना उडविले.

याप्रसंगी पी. के.शिंदे शाळेत ९वी त शिक्षण घेणार्‍या दुर्वा भागवत पाटील (वय १५), ऋतुजा राजु भोईटे (वय १५) या सायकलीवर घराकडे येत होते. तर, सुभाष रामा पाटिल(६०) व परशुराम दगा पाटिल(५२) या चारही जणांना या कारने उडविले. या चौघांना चिरडत गावाजवळ ही कार थांबली. यात परशुराम पाटील यांना वहानासह गाडीत अडकल्याने गाडी थांबली.

अपघाताची ही घटना इतकी भिषण होती की,काही कळण्याच्या आतच सुभाष दगा पाटील व दुर्वा भागवत पाटील हे जागीच ठार झाले.गावकर्‍यांनी गाडीने उडून दिलेल्यांना रस्त्यालगतच्या शेतातन अचलून आणण्या अगोदरच जळगाव कडुन येणार्‍या पोलीस गाडीने गाडीत बसलेल्या तरूणांना तत्काळ पाचोरा पोलिसात आणले. दरम्यान परशुराम पाटिल यांना उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले असुन ऋतुजा राजु भोईटे या मुलीला पाचोर्‍यात उपचार सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.