⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | बातम्या | प्रवाशांना दिलासा! दिवाळीनिमित्त भुसावळमार्गे चार विशेष रेल्वे गाड्या धावणार

प्रवाशांना दिलासा! दिवाळीनिमित्त भुसावळमार्गे चार विशेष रेल्वे गाड्या धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२४ । आगामी दसरा, दिवाळी तसेच छटपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडून चार विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहे, तर सहा विशेष गाड्या ज्या भुसावळ मार्गे धावतात यांच्या कालावधीत डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

मध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळी, छट पूजेच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सोडल्या जात असतात. नियमित रेल्वे गाड्यांना या काळात प्रचंड गर्दी वाढत असते. त्यामुळे स्पेशल डेली साप्ताहिक तसेच आठवड्यातून दोन दिवस अशा गाड्या या काळात मध्य रेल्वेकडून नियोजित केला जात असतात. यात साप्ताहिक, डेली गाड्या या सोडल्या जात असतात.

चार नवीन रेल्वे गाड्या पैकी केवळ सीएमएसटी-गोरखपूर या गाडीला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे, तर तीन गाड्यांना भुसावळ थांबा असणार आहे. या नवीन गाड्या… एलटीटी-नागपूर ०२१३९ व नागपूर-एलटीटी ०२१४० ही विकली स्पेशल गाडी ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत धावेल. सीएमएसटी गोरखपूर ०१०७९ व गोरखपुर-सीएमएसटी ०१०८० ही २२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दररोज धावेल. सीएमएसटी-अन्सोल ०११४५ व अन्सोल- सीएमएसटी ०११४६ साप्ताहिक धावेल. एलटीटी मुंबई- दानपुर ०११४३ व दानपूर-एलटीटी मुंबई ०११४४ ही गाडी २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर दररोज धावेल

०११३९ नागपूर-मडगाव विशेष रेल्वेची सेवा २८ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ०११४० मडगाव-नागपूर विशेष रेल्वे सेवा २९ डिसेंबरपर्यंत ०१२११ बडनेरा- नाशिक अनारक्षित रेल्वे व ०१२१२ नाशिक-बडनेरा अनारक्षित विशेष रेल्वे सेवा ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्यात येईल. रेल्वे क्रमांक ११०२५ दादर- बलिया रेल्वे ३० डिसेंबर, तर ११०२६ बलिया-दादर विशेष रेल्वेची सेवा १ जानेवारीपर्यंत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.