⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ढोल ताशांच्या गजरात मुक्ताईनगरात वनमहोत्सव साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई-भवानी अभयारण्यातील उचंदा येथील घाटे विद्यालयात यंदाचा वनमहोत्सव कार्यक्रम ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. तसेच वृक्षारोपणासह जनजागृती करण्यात आली. वनविभागाकडुन दि. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ‘वनमहोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या दिनानिमित्त वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन तसेच जंगलाचे असलेले महत्वांबाबत माहीती देऊन स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. यंदाचा कार्यक्रम हा वनविभागातर्फे घाटे विद्यालयात करण्यात आला होता.

वृक्षांचे महत्व लक्षात घेत वृक्षारोपणाची ओळख खऱ्या अर्थाने सन १ जुलै १९४७ मध्ये झाली. वृक्षरोपणाची पहीली मोहीम अब्दुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सारख्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. यानंतर, वनसंवर्धन व जंगलतोडीच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी १ जुलै १९५० मध्ये भारताचे केंद्रीय कृषी व अन्नमंत्री डॉ.के.एम.मुंशी यांनी संपुर्ण भारतात ‘वनमहोत्सवाची’ संकल्पना उदयास आणली. डॉ. मुंशी यांना हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपण मोहीम म्हणुन नव्हे, तर एक उत्सव म्हणुन समजावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. देशात पावसाळ्यात सुरुवातीला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव आयोजित करण्याचा कार्यक्रम योजिला जातो.

हवामान बदलाची सर्वात मोठी समस्या ही या वृक्षतोडीमुळे निर्माण होऊ शकते. वेळीच उपाययोजना राबविल्या नाही तर..निसर्गासह पर्यावरणाचा समतोलपणा ढासळुन सजीवसृष्टीसह मानव जातीला विपरीत परिणामांना सामोरे जावे लागेल.म्हणुन बराच उशीर होणेपुर्वी या समस्येवर लक्ष केंद्रित करुन ‘वनमहोत्सवासारखे सण’ साजरा करणे ही काळाची गरज आहे. कमी होत असलेली वृक्षसंख्येची तुट भरुन निघण्यासाठी प्रत्येकाने किमान दहा झाडे लावुन जगवावे. वृक्षसंवर्धन करणे हि प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.याव्यतीरीक्त झाडे पशु,पक्षी ,किटक यांना समर्थन देतात आणि म्हणुन राज्य सरकार आणि नागरी संस्था, संघटना या आठवड्याच्या सुरुवातीला ‘वनमहोत्सव’ सण साजरा करतात. वृक्षरोपण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, लोककल्याणकारी संस्था यांना विविध प्रकारची रोपे देतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें’पक्षी ही सुस्वरे आळवित‘ संत तुकाराम महाराजांनी असंख्य अभंगापैकी एका अभंगातील या दोन ओळीत भावार्थ सांगत निसर्गासह वृक्ष-वेलीचे महत्व पटवुन दिलेले आहेत.

मुक्ताई-भवानी अभयारण्याचे वनाधिकारी सचिन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील उचंदे येथील ए.एस घाटे विद्यालयात वनमहोत्सव सण दि.५ जुलै रोजी पार पडला. विद्यार्थांना वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देत गावातुन वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महाविद्यालयाच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक एम.बी.महाजन, शिक्षक ए.एस.पाटील, एम.बी.गायकवाड, बी.डी.पाटील, पी.पी.पाटील, हरीतक्रांतीचे शिक्षक पी एस तायडे तसेच वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनपाल डि.जी.पाचपांडे, वनरक्षक विकास पाटील, जी.बी.गोसावी, डि.एस पवार, असुरे, ज्ञानोबा धुळगंडे, थोरात, वनरक्षिका दिपाली बेलदार, वनमुर अशोक पाटील, योगेश कोळी, तु काराम गवळी, देवानंद ठाकरे, अरुण कोळी, इंगळे, वाहनचालक महेंद्र पुरकर, सुरेश महाले, सादिक पिंजारी यांच्यास ग्रामस्थउपस्थित होते.