⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

खडसेंचा पाठपुरावा : खिरोदा शिवारात २० दिवसांनंतर रोहित्र‎ बसवल्याने केळीच्या बागांना जीवदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । रावेर विधानसभा मतदरसंघातील ‎आमदार शिरीष चौधरी यांच्या‎ खिरोदा शेती शिवारातील विजेचा‎ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने केळी‎ बागायती धोक्यात आली होती. या ‎ट्रान्सफॉर्मरवरून वीज पुरवठा ‎असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम‎ आमदार चौधरी यांच्याकडे हा प्रश्न‎ सोडवण्याची मागणी केली होती.‎ मात्र चौधरी यांनी त्याकडे दुर्लक्ष ‎केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.‎ त्यानंतर त्यांनी माजी मंत्री एकनाथ‎ खडसे यांची भेट घेऊन व्यथा‎ मांडली. खडसे यांनी तत्काळ वीज‎ महावितरण कंपनीच्या‎ अधिकाऱ्यांना वीज ट्रान्सफॉर्मर‎ बसवण्याची विनंती केली.

त्यामुळे‎ २० दिवसांपासून पाण्याविना‎ कोमेजून जाणाऱ्या केळी बागा‎ वाचल्या आहेत.‎ खिरोदा येथील फैजपूर‎ रस्त्यावरील शेती शिवारातील‎ शेतकऱ्यांची ट्रान्सफॉर्मर‎ ‎जळाल्यामुळे फरफट होत होती.‎ वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे‎ तक्रार करूनही त्यांनी नवीन‎ ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ केली‎ हाेती. त्यानंतर चोरांनी खांबावरील‎ वीज वाहिन्यांची चोरी केली.‎ याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीच्या‎ अधिकाऱ्यांना माहिती देवून लवकर‎ ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विनंती‎ केली. मात्र २० दिवस होऊनही‎ ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने‎ शेतकऱ्यांनी माजी मंत्री खडसे यांची‎ भेट घेऊन त्यांना साकडे घातले.‎ ‎खडसे यांनी वीज महावितरण‎ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी‎ संपर्क करून शेतकऱ्यांचे होणारे‎ नुकसान, त्यांची परिस्थिती त्यांच्या‎ लक्षात आणून दिली. वीज‎ अधिकाऱ्यांनी सकारात्मकता‎ दाखवत अगदी दोन दिवसांत‎ साहित्याची पूर्तता करून‎ ट्रान्सफॉर्मरची तारांसह वीज जोडणी‎ करून दिली आहे. त्यामुळे या‎ शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन‎ खडसे यांचे ऋण व्यक्त केले.

चर्चा

या‎ वेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश‎ चौधरी, रोझोदा येथील शेतकरी‎ लीलाधर झांबरे, लखीचंद नेहेते,‎ रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल‎ नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी‎ उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार‎ असलेल्या शिरीष चौधरी यांच्या‎ गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न‎ भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ‎. विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत‎ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे‎ यांच्या माध्यमातुन सोडवला आहे.‎ या घटनेची तालुक्यात चर्चा सुरु‎ होती.‎