जळगावहुन मुंबईसाठी आता आठवड्यातून चार दिवस विमानसेवा

फेब्रुवारी 23, 2022 11:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । गेल्या पंधरा दिवसापासून बंद असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा आज बुधवारपासून पुन्हा सुरु होत आहे. मात्र, अहमदाबादसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, जळगावहुन मुंबईला आता आठवड्यातून चारच दिवस विमानाने जाता येणार आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून जळगावकरांसाठी साेयीची असणारी सकाळची विमानसेवा आता दुपारून असणार आहे.

airplain jpg webp

जळगाव शहरातून अहमदाबाद-मुंबई, काेल्हापूर-नांदेड या चार शहरांना ट्रु-जेट या कंपनीतर्फे सेवा पुरवली जात हाेती. गेल्या ७ फेब्रुवारीपासून ती बंद ठेवण्यात आलेली आहे. ती बुधवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने साेमवारी झालेल्या बैठकीत घेतला. तर मंगळवारी विमानसेवेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले. विमानसेवा खंडित हाेण्यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून पाच दिवस अहमदाबाद व मुंबईसाठी फ्लाइट असायच्या. तर मुंबईहून काेल्हापूरसाठी तीन दिवस आणि नांदेडसाठी आठवड्यातून दाेन दिवस कनेक्टिव्हिटी असायची; मात्र आता साेमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या चार दिवसांसाठीच मुंबई सेवा असणार आहे.

वेळेत झालेला महत्त्वाचा बदल जरूर लक्षात घ्या
ट्रु-जेट कंपनी मूळ हैदराबादची आहे. देशात २६ विमानतळांवर सेवा देण्यासाठी कंपनीने अहमदाबाद येथे बनवले; परंतु व्यवस्थापनातील बदलाने कंपनीने आपले मुख्यालय हे अहमदाबादहून हैदराबादला हलवले आहे. तसेच अहमदाबादहून जळगावला येणारी विमानफेरीही पहिल्या टप्प्यात बंद ठेवली आहे. आता नव्या वेळापत्रकात मुंबई सेवा देताना कंपनीने वेळेत बदल केला आहे. पूर्वी सकाळी ९.५० ला मुंबईसाठी फ्लाइट हाेती. आता त्यात बदल झाला असून, दुपारी काेल्हापूरहून मुंबईला विमान येईल ते मुंबईहून ३ वाजेच्या दरम्यान जळगावात लॅण्ड हाेऊन २० मिनिटांच्या हाॅल्टनंतर पुन्हा मुंबईला परत जाईल. तेथून ते नांदेडला रवाना हाेईल.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now