⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

महिलेच्या गर्भपिशवीतून काढल्या पाच गाठी; देवकर रुग्णालयात शस्त्रक्रियेत झाली दहा हजारांची बचत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयातून शस्त्रक्रियेद्वारे पाच गाठी काढण्यात आल्या. महाअभियानांतर्गत झालेल्या या शस्त्रक्रियेत रुग्णाची 10 ते 15 हजार रुपयांची बचतही झाली.

खेडी आव्हाने येथील रहिवासी व सध्या गणपती नगरमध्ये राहणाऱ्या वर्षा सुनील चौधरी (वय 45) यांना वर्षभरापासून पोटदुखीचा त्रास होता. त्यांनी शहरातील डॉक्टरांकडे तपासणी केली असता गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च त्यावेळी सांगण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी श्री सुनील चौधरी यांना देवकर हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया महाअभियानाची माहिती मिळाली.

त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधला. या ठिकाणी संपूर्ण औषधी व शस्त्रक्रिया व डिस्चाजपर्यंतचा खर्च केवळ 17000 रुपये सांगण्यात आला. श्री चौधरी यांनी तातडीने शस्त्रक्रियेसाठी श्रीमती वर्षा चौधरी यांना ऍडमिट केले. येथील तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयावरील 5 पाच गाठी
काढून गर्भाशयाची शस्त्रक्रिया केली‌. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला.

दहा ते पंधरा हजार रुपयांची बचत
शस्त्रक्रियेबद्दल श्री चौधरी यांनी सांगितले की, शहरातील इतर दवाखान्यांमध्ये हा खर्च तीस ते पस्तीस हजार रुपये सांगण्यात आला होता. मात्र देवकर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह केवळ 17 हजार रुपयांमध्ये संपूर्ण औषधीसह ही शस्त्रक्रिया पार पडली. येथील सुविधा पंचतारांकित दर्जाची असून, संपूर्ण स्टाफ हा समर्पित भावनेने काम करत असल्याचे अनुभव आम्हाला आले. रुग्णालयाचे शस्त्रक्रिया महाअभियान हे खरोखर कौतुकास्पद आहे. इतर रुग्णांनीही शस्त्रक्रियेसाठी देवकर रुग्णालयाचीच निवड करावी, असे आवाहनही सुनील चौधरी यांनी केले.

हे देखील वाचा :