⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, सात जणांविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । सासरच्या मंडळींना मानपान दिला नाही, या कारणावरून तसेच माहेरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेला मारहाण व छळ केल्याची घटना घडली. या प्रकरणी फेकरी (ता.भुसावळ) येथील सासरच्या सात जणांविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात पाच कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

बोहरे (ता.अमळनेर) येथील माहेर असलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा फेकरी येथील अशोक दशरथ पाटील यांचा मुलगा विनायक याच्याशी विवाह झाला. लग्नात सासरच्या मंडळींना मानपान दिला गेला नाही, म्हणून विवाहितेचा सासरी छळ केला जात होता. तर शेती विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून तगादा लावून, १८ एप्रिल २०१९ च्या सहा महिन्यानंतर ते १२ मार्च २०२१ पर्यंत पती, सासू, सासरे, जेठ, जेठाणी, चुलत जेठ व चुलत जेठाणी यांनी छळ केला. विवाहितेने आपबिती आई वडिलांना सांगितली. त्यानुसार पीडीतेने मारवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी विवाहितेचा पती विनायक पाटील, सासरे अशोक दशरथ पाटील, सासू शोभाबाई पाटील, जेठ दिलीप पाटील, जेठाणी मनीषा पाटील, चुलत जेठ विजय पाटील व चुलत जेठाणी वर्षा पाटील (सर्व रा.फेकरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार मुकेश साळुंखे तपास करत आहेत.

हे देखील वाचा :